Ad will apear here
Next
फोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान
पुण्याच्या ध्रुव फडकेचा अभिनव उपक्रम

पुणे : हौसेला मोल नसते, असे म्हणतात; पण या हौसेला सामाजिक जाणीवेचे भान दिले, तर त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. पुण्यातील ध्रुव फडके याने हौसेखातर जोपासलेल्या फोटोग्राफीच्या छंदाला सामाजिक जबाबदारीची जोड दिली आहे. त्याने त्याच्या फोटोंचे प्रदर्शन भरवले असून, त्यातून मिळणारे उत्पन्न रत्नागिरीतील त्याला ‘सहयाद्री निसर्ग मित्र’ या संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.  


सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या प्रदर्शन दालनामध्ये त्याने काढलेल्या विविध प्राणी, पक्षी, निसर्गाची रमणीय रूपे दर्शविणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. अकरा डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. 


ध्रुव फडके याने नुकतेच आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले असून, आई, वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने फोटोग्राफीचा छंद जोपासला. निसर्गाचे फोटो काढायला त्याला अधिक आवडत असल्याने त्याने अनेक फोटो काढले आहेत. 

ध्रुव फडके
याचदरम्यान रत्नागिरीतील कासव संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘सह्याद्री मित्र संस्थे’च्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कार्याला मदत करण्याचा विचार करत असताना, त्याला या प्रदर्शनाची कल्पना सुचली. या अभिनव उपक्रमामुळे त्याने तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण केला असून, लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे.  


कार्यक्रमाविषयी 
ध्रुव फडके यांच्या निसर्ग फोटोंचे प्रदर्शन 
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, सेनापती बापट मार्ग 
दिवस : मंगळवार, अकरा डिसेंबर २०१८

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUYBV
 Amazing photographs. And a very Noble cause .All the best.
 Very proud of you. Great work great cause.
 Good conceptual photography. Amazing picture
 Very Detailed and Articulate Photography, Great eye for Detailing...Very Just Cause to Support..Keep it up
 Amazing photography! Enjoyed seeing all with story behind each picture. Great work! Keep it up!👍
 Congratulations Dhruv !! Proud of you...very nice exibition and nice idea to help to Turtle conservation.
Similar Posts
डॉ. श्रीकांत केळकर यांच्या छायचित्रांचे प्रदर्शन पुणे : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाच व सहा फेब्रुवारी २०१९ रोजी जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पाच फेब्रुवारीला सकाळी १० वाजता प्रसिद्ध कलाकार रवी परांजपे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन पुणे : ‘रिवा, कल्ला-मोहल्ला आणि अॅडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन रोज
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
समीर बेलवलकर यांची ‘शूट्स विथ सॅम’ सुविधा पुणे : उत्तम छायाचित्रकार शोधायचा असेल आणि तेदेखील वाजवी खर्चात, तर आता ते अगदी सोपे झाले आहे. जोधा अकबर, माय नेम इज खानसारख्या बॉलीवूड चित्रपटांचे छायाचित्रकार; तसेच करीना कपूर, शाहरुखखान, करण जोहर यांच्याबरोबर कामाचा अनुभव असलेले सेलेब्रिटी छायाचित्रकार समीर बेलवलकर यांनी ही अनोखी सुविधा उपलब्ध केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language